आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील वडखुट येथे घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीच्या खांबावर चढून काम करताना हा अपघात घडला. अनिल फत्तेसिंग गावित (वय ३५) रा. धनबर्डी नागझरी असे मृत वीज वितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. या अपघातानंतर बराच वेळ मृतदेह खांबावर लोंबकळत होता. यासंदर्भात नातेवाइकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश करत दोषींवर कारवाईची मागणी केली.
महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे अनिल गावित विजेच्या खांबावर काम करत होते. परंतु अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काम करताना यासाठी फोन परमिट घेण्यात आले हाेते.
त्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर वीज प्रवाह कसा सुरू झाला, याची चौकशी होणं गरजेचे आहे. नवापूर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील ग्रामीण १ मध्ये गावित वरिष्ठ तंत्रज्ञ असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंते हेमंत बनसोड यांनी दिली असून या संदर्भात सखोल चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. मृतदेह खांबावर लाेंबकळत राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.