आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:शहाद्यात आयोजित उन्हाळी कराटे क्रीडा प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वृंदावन नगर मधील नगरपालिकेच्या खुल्या जागेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार, व स्पोट्र्स कराटे असोशियन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने उन्हाळी कराटे क्रीडा प्रशिक्षण घेण्यात आले. उन्हाळी कराटे क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक के.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. सुमारे १५ दिवस चाललेल्या या शिबिरात खेळाडूंसाठी कराटे, कोरियन कराटे, सिकाई मार्शल आर्ट, आधी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंना प्रा. डॉ. अरविंद कांबळे, डॉ. दिनेश बैसाणे, कराटे प्रशिक्षक शुभम कर्मा, प्रा. डॉ. मयूर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवाय खेळाडूंना सर्व प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.

कराटे क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, माजी नगराध्यक्षा करुणा पाटील, माजी नगरसेवक के.डी. पाटील, संदीप पाटील, प्रा.डॉ.अरविंद कांबळे, प्रा.डॉ. दिनेश बैसाने, प्रा. डॉ. मयूर ठाकरे उपस्थित होते. शिबिरात सहभागी सर्व खेळाडूंना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मयूर ठाकरे यांनी केले. करण निकुबे व कमलेश कुडके यांनी आभार मानले. वृंदावन नगर परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

मुलांनी प्रत्येक खेळामध्ये कौशल्य आत्मसात करावे
मुलांनी शिक्षणासोबत मैदानी खेळाकडे वळावे. खेळांकडे विकासात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. मुलांनी आपल्या प्रत्येक खेळांमध्ये कौशल्य दाखवावे. मुलांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असून तेव्हा ते स्पर्धेत टिकू शकतील, असे उपसंचालक सुनंदा पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...