आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:तळोद्यातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; रघुवंशींनी केले स्वागत

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील शंभरावर कार्यकर्त्यांसह छोटा धनपूर, अलवान, जुवाणी, पाडळपूर, बंधारा या पाच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी रघुवंशी यांनी त्यांचा सत्कार, स्वागत केले. येथे रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात तळोदा तालुक्यातील शेकडोंच्यावर कार्यकर्त्यांनी त्याच प्रमाणे छोटाधनपूर ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्ते, अलवानच्या सरपंचांसह सर्व सदस्य, जुवाणीचे माजी सदस्यांसह विद्यमान सदस्य, पाडळपूरचे उपसरपंच, बंधाऱ्याचे सरपंच, उपसरपंचांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना गमछा भेट देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, किरसिंग वसावे, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, रवींद्र गिरासे, तालुकाप्रमुख अनुप उदासी, शहर प्रमुख जगदीश परदेशी, जि.प. सदस्य देवमन पवार, जि.प. सदस्य प्रतिनिधी भाऊसाहेब शिंत्रे, विकासाे चेअरमन मधुकर पाटील, भाऊसाहेब माळी, अमृत पावरा, मंगल पाडवी आदी उपस्थित होते.

यावेळी छोटा धनपूर ग्रा.पं.चे माजी सरपंच बाबूलाल पवार, सदस्य जिजाबाई पवार, योगेश पवार, नारायण वसावे, ग्रुप ग्रा.पं. अलवानचे सरपंच सुभाष वळवी, सदस्य धीरसिंग वळवी, विनस राहसे, जलसिंग वळवी, वसंती ठाकरे, अनिता वळवी, राजूबाई पवार, मिसूबाई वळवी, कुंदाबाई वळवी, ग्रा.पं. सदस्य मगन ठाकरे, रूमा मोरे, अंबुलाल वळवी, प्रवीण कुलकर्णी, राजू पवार, बंधारा सरपंच मधुकर ठाकरे आदींसह शेकडाे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

गाव विकासासाठी प्रयत्न व्हावेत : रघुवंशी
ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी. तळोदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखा उघडायच्या आहेत. शाखेचे नियोजन कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन माजी आमदार रघुवंशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...