आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:धडगावातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी ; कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश

धडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील असली व माथा असली तसेच रामसुला येथील काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

असली व रामसुला येथे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल निवडणूक लढवत आहे. या प्रवेशावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, धडगाव तालुकाप्रमुख महेश पाडवी, मोहन महाराज यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...