आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्तीचा बालसंशोधकांनी सुचवला पर्याय

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका विज्ञान प्रदर्शनात यंदा बाल संशोधकांनी प्रदूषण मुक्तीवर उपकरणे तयार करून उपस्थितांना प्रदूषण मुक्तींचा संदेशासह पर्यायाही दिला. हवेचे प्रदूषण, दूषित पाणी, पार्किंग या समस्या संपूर्ण मानव जातीला आव्हान ठरत असून सुविधा व स्वार्थांनी माणसाला अडचणीत आणले आहे. या समस्यांवर शोध लावून उपाययोजना सांगणाऱ्या बाल संशोधकांचे उपकरणे लक्षवेधी ठरले.

येथील श्रॉफ हायस्कूलच्या साईबाबा सभागृहात तालुका विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून यात मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आर. बी. पाटील, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश पटेल, शिक्षण विस्तार अधिकारी एस .एफ. ठाकरे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, मुख्याध्यापिका सुषमा शाह, मनीष शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, फयाझखान, मनोहर साळुंखे उपस्थित होते. शहरीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात समसमान सहभाग नोंदवला. प्राथमिक गट १, उच्च प्राथमिक गट ३८, माध्यमिक उच्च माध्यमिक गट ५३ व अन्य १० असे एकूण १०२ उपकरणांचा सहभाग नोंदवण्यात आला. विज्ञान शिक्षक नितीन देवरे, राजेश शाह, सिसोदिया आदींसह शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन चेतना पाटील व आभार वसंत पाटील यांनी मानले.

प्रदर्शनात ही उपकरणे ठरली खास आकर्षण
संुदरदे येथील आदर्श माध्यमिक शाळेच्या निशांत बंजारा याने पर्यावरणपूरक उद्योगाची मांडणी, चिन्मय पवार, कृष्णा पाटील या दोघांनी जादूची पेटी बनवली. मयूर सावंत या विद्यार्थ्यांने भूकंप सूचक यंत्र तयार केले, राधिका महाजन हिने बहुपयोगी कापणी यंत्र बनवले. डी. आर. हायस्कूलच्या वेदांत पाटील व वैभव पवार या दोघांनी वेस्ट वाॅटर ट्रिटमेंट प्रोसेस तयार केले. तर कमला नेहरू विद्यालयाच्या निधी मराठे व भूमिका जाधव यांनी हायड्रॉलिक पार्किंगचे मॉडेल तयार करून पार्किंगच्या भविष्यात येणाऱ्या समस्येवर तोडगा काढून दिला.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा
विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचाही सहभाग नोंदवावा. त्यांच्याही बुद्धीला चालना मिळावी. आदिवासी विकास व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन भरवण्यात यावे. - शैलेश पटेल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी

बातम्या आणखी आहेत...