आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवारण:पदवीधर निवडणुकीसाठी‎ आचारसंहिता कक्ष स्थापन‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या‎ आदेशानुसार नाशिक विभागाची‎ पदवीधर मतदार संघ द्विवार्षिंक‎ निवडणूक २०२२-२०२३ च्या‎ अनुषंगाने जिल्हास्तरावर‎ आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष‎ स्थापन करण्यात आल्याची माहिती‎ निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार‎ तथा नाशिक विभाग पदवीधर‎ मतदार संघ नंदुरबार आचारसंहिता‎ तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर‎ खांदे यांनी दिली आहे.

नाशिक‎ विभाग पदवीधर निवडणूक‎ प्रक्रियेमुळे नंदुरबार जिल्ह्यात‎ आचारसंहिता घोषित झाली असून‎ जिल्हास्तरावर २४x७ आदर्श‎ आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात‎ आला आहे. आचार संहितेच्या‎ उल्लघंनाबाबत आकस्मिक‎ निरीक्षणासाठी जिल्हास्तरावर‎ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या‎ अध्यक्षतेखाली त्वरीत कार्यवाहीची‎ टिम गठीत करण्यात आली आहे.‎ नागरीकांनी आचारसंहिता‎ तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक‎ ०२५६४-२१०००६वर संपर्क साधावा,‎ असे निवासी उपजिल्हाधिकारी‎ खांदे यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...