आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नंदुरबार जिल्हा फळ बागायतदार संघाची स्थापना; केळी, पपई उत्पादकांना आता व्यासपीठ उपलब्ध

शहादा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात फळ बागायतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पपई व केळीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. या फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी नेहमीच संघर्ष करावा लागतो. या शेतकऱ्यांच्या हितासाठी अभिजित पाटील यांनी पपई, केळी फळ बागायतदार संघाची स्थापना केली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते संस्थेच्या प्रवर्तकांना नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

जिल्ह्यात केळी आणि पपईची लागवड दरवर्षी वाढत आहे. पपईच्या लागवडीबाबत जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे. मात्र तरीही दरवर्षी विक्रीसाठी शेतकऱ्यांचे मोठे हाल होतात. फसवणूक होते. या व अन्य समस्यांची या माध्यमातून सोडवणूक होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री, डीडीआर भारती ठाकूर यांच्या हस्ते संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुख्य प्रवर्तक अभिजित पाटील, संचालक हरी पाटील, मुकेश पाटील, यशवंत पाटील, दीपक पाटील, राहुल सनेर, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

सर्वांनी सभासदत्व घ्यावे
जिल्ह्यात केळी, पपई पिकांचे उत्पादन ६ लाख टनापेक्षा जास्त आहे. याबाबत कुठल्याही प्रकारचे व्यासपीठ आजपर्यंत उपलब्ध नव्हते. या संस्थेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर मात करता येईल. जिल्ह्यातील सर्व केळी, पपई फळ बागायतदार शेतकऱ्यांना या संस्थेचे सभासदत्व घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...