आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या धनपूर धरणाचे काम अखेर गेल्या पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या धरणामुळे २७२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्याप तहानलेलेच राहिले आहे.
बोरद परिसरातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आजघडीला मोजक्याच गावांना या धरणाचा लाभ होताना दिसून येत आहे. या परिसरातील शेतकरी सुझलाम-सुफलाम हाेण्यासाठी १ जुलै १९९७ रोजी नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित असताना स्व.पी.के. पाटील यांनी धनपूर धरणाचा प्रस्ताव त्यांना सादर करून या विषयाला चालना दिली होती. जून २०१७ पासून या धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कळमसरा, धनपूर, सिलिंगपूर, खर्डी, लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छो. धनपूर, राणीपूर आदी.
गावातील साधारणतः २७२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार हे स्पष्ट झाले होते. या परिसरातील शेती बागायती होणार अाहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी सुखी आणि समाधानी होईल व त्याच्या उत्पन्नात वाढ होईल हे ठासून सांगण्यात आले; परंतु अद्याप शेतांपर्यंत पाणी पोहाेचलेच नाही. हा परिसर पूर्णपणे आदिवासी भागातील असल्याने सातपुडावर राहणारा आदिवासी बंधू त्याच्या परिसरातील बदल झाल्यावर मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देईल यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनेल आणि त्यांच्या जमिनी संदर्भातील पाण्याची समस्या कायमची सुटेल हाच यामागचा उद्देश होता. धान्याच्या बाबतीत जर माहिती घ्यावी तर या धरणाची लांबी साधारणतः ४२२ मीटर असून उंची २०.१८ मीटर तर खोली १६० मीटर आहे पाण्याची पातळी वाढल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात धरणाचे पाणी नेसरी नदीत सोडण्यात येणार आहे. या धरणामुळे परिसरातील कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढणार, असे सांगितले आणि प्रत्यक्षात धरणामुळे परिसरातील कूपनलिकांचे पाण्याच्या पातळीमध्ये बरीचशी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी आहे मंजूर संघर्ष समितीच्या वतीने पाटचारीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे; परंतु २०२२ उजाडले तरी अद्यापही पाटचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे धरणात साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून जमिनीत जेवढे पाणी निचरा होतो तेवढ्यात पाण्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कूपनलिकांच्या माध्यमातून आपल्या शेतात या पिकांची तहान भागवली जात आहे. पाटचारी केली तर ठरल्याप्रमाणे २७३ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार हे तेवढेच सत्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.