आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदावर विरजण:दिवाळी होऊनही पोहोचलेली नाही अजून दुर्गम भागात आनंदाची शिधा

सुधीरकुमार ब्राम्हणे| अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाची बहुचर्चित आनंदाची शिधा या शंभर रुपयांच्या किटला वस्तूंच्या अपूर्ण पुरवठ्यामुळे लाभार्थ्यांच्या घरात जाण्याचा मुहूर्त मिळालाच नाही. अखेर दिवाळी संपून आठवड्याचा कालावधी लोटत असताना देखील अद्यापपर्यंत रास्त दुकानदारांना वस्तूंचाच पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत किट मधील संपूर्ण वस्तूंचा पुरेसा पुरवठा न झाल्याने तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना अद्यापपर्यंत आनंदाची शिधामधील संपूर्ण वस्तू मिळाल्या नसल्याने गरीब आणि गरजू नागरिकांची दिवाळी आनंदाच्या शिधाच्या आशेवरच गेली. दिवाळी गोड होण्याऐवजी आनंदावर विरजण पडत आनंदाच्या शिधा योजनेचा बट्ट्याबोळ झाला.अक्कलकुवा तालुक्यात एकूण २०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत.

त्यात अंत्योदयचे १८८६२ तर प्राधान्य कुटुंबाचे २२००४ असे एकूण ४०८६६ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी ४०८६६ किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चणाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र आज पर्यंत संबंधित यंत्रणेकडून ३७ हजार ७६४ लिटर पामतेल, ३४ हजार ३५० किलो रवा, तर ३८ हजार ७६० किलो चणाडाळ, ३८ हजार ४० किलो साखर प्राप्त झाली आहे. तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानांत पाम तेल, रवा, चणाडाळ, साखर पोहोच करण्यात आलेली आहे.

मात्र अद्यापपर्यंत संपूर्ण दुकानांत किट मधील सर्व वस्तूंची उपलब्धता दुकानदारांना न झाल्याने तालुक्यातील शिधापत्रिकाधारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधापासून वंचित झालेत. तरी देखील उपलब्ध झालेल्या वस्तूंचे नुकसान होऊन झीज होऊ नये यासाठी दुकानदारांनी उपलब्ध वस्तूंचे वितरण करण्यास प्रारंभ केला आहे. तर अतिदुर्गम भागातील मोलगी गोदामा अंतर्गत येणाऱ्या रास्त दुकानात चारही वस्तू पोहाेचलेल्या नाहीत.

२०१ पैकी ४० दुकानांना पोहाेचल्या शिधा किट
आजपर्यंत तालुक्यातील २०१ दुकानांपैकी जवळपास फक्त ४० दुकानांत किट मधील संपूर्ण वस्तू पोहोच करण्यात आल्या आहेत. तर अद्यापही उर्वरित दुकानांत संपूर्ण वस्तंूचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी हे आनंदाच्या शिधापासून अजूनही दुखी असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...