आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर:लॉकडाउनमध्येही हजारो हातांना मिळाले काम, प्रशासनाने विविध योजनांअंतर्गत मजुरांना दिला रोजगार

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आज घडीला 2047 मजूर नवापूरमध्ये कार्यरत, एकूण 5000 पेक्षा अधिक लोकांना मिळणार काम

गुजरात राज्यातून आलेल्या हजारो मजुरांना लॉकडाऊन दरम्यान काम नसल्याने अश्या परिस्थितीत नवापूर तालुका प्रशासनाने विविध योजनांअंतर्गत काम उपलब्ध करून दिल्याने नवापूर पॅटर्न नक्की कौतुकास्पद ठरले. नवापूर तालुक्यातील प्रशासनाचे योग्य नियोजन असल्याने येथे अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. 

तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चेडापाडा येथील मजुरांशी अधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यांना नरेगा योजनेतून काम उपलब्ध करून दिले. गाळ काढण्याच्या कामावर 339 मजुरांची उपस्थिती होती. सर्वजण तोंडाला मास्क बांधून प्रत्येक कुटुंबाला आखून दिलेल्या ठिकाणी काम करत असतांना दिसून आले. लॉकडाऊन दरम्यान लोकांना गावातच रोजगार मिळाला. लोकांमधील असंतोष कमी होत आहे, पावसाळ्यात खरिपाला बियाणे खरेदी व शेतीच्या मशागतीसाठी प्रती कुटुंब 10-15 हजार रूपये शिल्लक राहतील. 

गाळ काढण्यातून जलसंधारण होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. लोक कामात व्यस्त राहतील त्यामुळे विनाकारण प्रवास करणार नाहीत. तसेच पैसा नसल्याने तयार होणाऱ्या समस्या येणार नाहीत. त्यामुळे गावोगावी अशी कामे सुरू करण्यासाठी 25 नोडल अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत निहाय नेमणूक केली आहे. तालुक्यात आलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याचा 100% प्रयत्न होत आहे. ज्याला हवा त्यांनी तात्काळ रोजगार मागणी करावी. 5000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. आज 2047 लोक कामावर आहेत. भविष्यात मजुरांची वाढ होईल.