आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे : डॉ. शिंदे

नंदुरबार20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक रक्तदान दिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयातील शिबिराला प्रतिसाद

अत्यावश्यक रुग्णासह प्रत्येक वेळी रक्ताची गरज भासते. म्हणून रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी व्यक्त केले.

नंदुरबार येथे जागतिक रक्तदान दिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी व परिचारिका महाविद्यालय शाखेतर्फे मंगळवारी रक्तदान शिबिर झाले. यावेळी शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्वत: रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. या शिबिरा अनेकांनी प्रोत्साहित होऊन जिल्हा रुग्णालय नंदुरबार व जिल्हयातील विविध विभागातील येथील विविध अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समवेत जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने औचित्य साधत सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के.डी. सातपुते, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र खेडकर, डॉ. पाथरवट, रक्त पेढी प्रमुख तथा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयांचे प्राचार्य जितेंद्र चव्हाण व रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी हजर होते. शिबिरात डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह प्राचार्य जितेंद्र चव्हाण, शिक्षक कल्पेश पवार, सुशील केदार, संतोष मुठे, ममता ठाकरे, नम्रता मदने आणि शिक्षकेतर कर्मचारी सागर कोळी व मनोहर खैरनार यांनी तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. सायंकाळपर्यंत रक्त दात्यांचा ओघ चालूच होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रमा वाडीकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...