आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. मात्र, येथील धानोरामधील मतदान केंद्रामध्ये EVM मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल दीड तास मतदान प्रक्रिया बंद होती.
मशीनच्या दुरुस्तीनंतर दीड तासाने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.
सकाळी 10 वाजता पहिला बिघाड
धानोरा ग्रामपंचायतच्या बुथ क्रमांक 4 वरील ईव्हीएम मशिनमध्ये आज सर्वप्रथम सकाळी 10 वाजेच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे मशीन बंद पडले. त्यानंतर दुसरे मशिन आणण्यात आले. मात्र, त्यातही बिघाड झाला व बुथवर तिसरे मशिन आणण्यात आले आहे. मात्र, तेही बंद पडले. त्यामुळे तब्बल दीड तास मतदान बुथ क्रमांक 4 वरील मतदान प्रकिया बंद होती.
केबलमध्ये बिघाड
मशीनच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने मशीन काम करत नव्हती, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 3 मशीन बदलाव्या लागल्या. तेव्हा कुठे मतदान प्रक्रिया सुरळीत होऊ शकली नाही. दुरुस्तीसाठी तांत्रिक टीम तातडीने मतदान केंद्रात दाखल झाली होती.
तांत्रिक टीमने EVM मशीन दुरूस्तीचे काम केले. दरम्यान, धानोरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथे एकूण 5 बुथ आहे. उर्वरित 4 बुथवर सकाळपासून मतदान सुरळीत सुरू आहे. एका बुथवरील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया दीड तास बंद होती. त्यामुळे केंद्रावरील मतदार ताटकळले होते.
मतदान संथगतीने
दरम्यान, नंदूबार तालुक्यात संथगतीने मतदान सुरू आहे. नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत 12 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा आकडा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.