आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह; दहीहंडी फोडून बालगोपालांकडून जल्लोष

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कामनाथ महादेव मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात श्रीमद्भागवत कथेच्या निमित्ताने रविवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. ‘कृष्ण कृष्ण, जय कृष्ण कृष्ण’, ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लालकी’च्या जयघोषात बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला.

नंदुरबार शहरातील लक्ष्मीनारायण नगरात श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने कथेच्या पाचव्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठा उत्साह दिसून आला. कथास्थळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भगवान कृष्ण यांचा जयघोष करत बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. तर महिला भाविकांनी रास गरबा खेळत श्रीकृष्ण भक्तीचा गजर केला. सजीव देखावा हेमंत बागुल यांनी साकारला. तर श्रीकृष्णाची भूमिका रियांश गिरासे व उर्वेश बागुल यांनी केली. भाविकांनी रविवारी सायंकाळी ५६ भोग महाप्रसाद अर्पण केला. आज सोमवारी सकाळी ११ वाजता महाप्रसादाने कथेची सांगता होईल.

कृष्ण नामाचा जप करा : भागवताचार्य जोशी
कथेचे निरूपणात भागवताचार्य अविनाश जोशी म्हणाले, ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा पृथ्वी तत्त्वाचा ग्रह आणि चंद्र मनकारत्त्वाचा ग्रह आहे. बुद्धीची देवता सूर्य तर चंद्र मनाची देवता आहे. मन हे एकाग्र झाले पाहिजे. मनाची एकाग्रता भंग होणार नाही, चित्त विचलित होणार नाही. मनाची अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी कृष्ण नामाचा जप करा.

बातम्या आणखी आहेत...