आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तृतीय रत्न:‘महाज्योती’तर्फे आज ‘तृतीय रत्न’चा प्रयोग ; शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बुधवार ८ जून रोजी सायंकाळी सात वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनिरुद्ध वनकर यांनी दिग्दर्शन केले असून क्रिएटिव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण ३० कलाकार व सहकाऱ्यांचा सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...