आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या हमी भावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी शनिवार ७ जानेवारीपर्यंत वाढीव मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी. सोनवणे यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी व बाजरी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाइव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे कळवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.