आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहादा आगारातून लांब पल्ल्याच्या जादा बसेस; बसस्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली माहिती; प्रवाशांची झाली सोय

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारातून पुन्हा लांब पल्ल्याच्या नवीन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बसस्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या आठवड्यात बदलापूर पुणे व नाशिक येथील बसेस सुरू केल्या होत्या. आता पुन्हा नवीन बसेस सुरू केल्या आहेत. शहादा- परळी, सकाळी साडेसहा वाजता सुटेल तर परळी येथून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सुटेल. शहादा- अहमदाबाद, सकाळी सात वाजता शहादा येथून सुटेल तर अहमदाबाद येथून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सुटेल.

शहादा- कल्याण, सकाळी सव्वानऊ वाजता शहादा येथून सुटेल व कल्याण येथून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुटेल. शहादा-पुणे, पुन्हा नव्याने सुरू केलेली बस शहादा येथून सकाळी दहा वाजता सुटेल व पुणे येथून सकाळी नऊला सुटेल.

शहादा औरंगाबाद, ही बस सकाळी ११ वाजता शहादा येथून सुटेल तर दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथून शहादासाठी सकाळी सहा वाजता सुटेल. वरील सर्व लांब पल्ल्याचा बसफेऱ्या प्रवाशांची मागणी बघता सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख योगेश लिंगायत व बसस्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...