आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्तींचे विसर्जन:सारंगखेड्यातील १० गणेश मंडळांतर्फे बाप्पाला निरोप

सारंगखेडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे ५ दिवसांचे दुसऱ्या टप्प्यातील १० गणेश मंडळांकडून वाजतगाजत श्रींचे विसर्जन करण्यात आले. गावातील सर्व गणपती पाचव्या दिवशी विसर्जनाची येथे परंपरा आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात भक्तांनी बाप्पाला निराेप दिला. विसर्जन साेहळ्यांतर्गत गावातील सर्व गणेशमूर्तींचे तापी नदीत विसर्जन करण्यात आले. महिला व शाळकरी मुलींनी लेझीम सादर करत मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मिरवणुकीसाठी प्रकाशाची व्यवस्था, रस्त्याची दुरुस्ती करून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामपंचायत सदस्य हे स्वत: विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागू नये म्हणून स्वतः मंडळाच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित होते. यावेळी गावातील नवयुवक, महाराणा प्रताप, जय श्री राम, महर्षी वाल्मिकी, जय भद्रा, भोईराज, इंडियन ग्रुप, जय महाकाल शिव बाबा मंडळ या प्रमुख गणेश मंडळांसह गावातील छोट्या मंडळांकडून श्रींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यासाठी प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. येथील मुख्य बाजारपेठ, ग्रामपंचायत चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, भोईराज चौक, जय भद्रा चौक, वाल्मिकी चौक, शांतीनगर, एकलव्य चौक, होळी चौक, रावल गढी ते तापी नदी अशा ठिकाणाहून ढोलताशांच्या गजरात, मोठ्या बेंजो पार्टी, पारंपरिक वाद्य, बँड वाजंत्री यांच्या गजरात नृत्य करत बाप्पा गणरायाला निरोप देण्यात आला. पोलिस प्रशासन, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विसर्जन पार पडले.

बातम्या आणखी आहेत...