आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण निर्मूलन:खेतियाला अतिक्रमण निर्मूलन मोहीम; सुमारे दीड कोटी रुपये किमतीची जागा प्रशासनाने खाली केली

खेडदिगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेतिया येथील नगरपंचायतीने अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली. मुख्य बाजारपेठ अशोक रोड परिसरातील सुमारे दीड कोटी रुपये किमतीची जागा प्रशासनाने खाली केली.

उपविभागीय अधिकारी पानसेमल अंशू जावला यांनी काढलेल्या आदेशानुसार बुधवारी दुपारी १ वाजता तहसीलदार राकेश सत्या यांच्या उपस्थितीत अतिरिक्त तहसीलदार हुकुमसिंह निगवाल, मुख्य नगरपालिकेचे अधिकारी यशवंत शुक्ला, महसूल विभाग, नगर पंचायत यांच्या पथकाने ही जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे.

यावेळी पोलिस बंदोबस्तही होता. अतिक्रमण काढण्यासाठी केलेली ही कारवाई पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे. त्याअंतर्गत कारवाई करत दीड कोटींहून अधिक किमतीची जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवताना एक भिंत कोसळल्याने जेसीबीच्या काचाही फुटल्या.

दुसऱ्या दिवशी ही बसस्टँड परिसरातील पानाच्या टपरीसह चहा दुकानाचे ही काढले. खेतिया नगर परिषदेत जे ही अतिक्रमण आढळून येईल ते हटवण्यात येईल, असे पानसेमलचे अति.तहसीलदार हुकूमसिह निगवाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...