आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:रनाळेच्या विकासोवर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे 13 जागांवर वर्चस्व

रनाळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रनाळे विविध कार्यकारी सोसायटी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सर्वच १३ जागेवर विजय मिळवला आहे. बळीराजा विकास पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवात दिग्गज लोकांना हार पत्करावी लागली आहे. या विजयामुळे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाचे वर्चस्व प्राप्त झाले आहे.

रनाळे विकासोच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख जितू ओगले व शरद तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे १३ जागेवर उमेदवार निवडून आले. निवडून आलेले उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदार संघात राजेंद्र नारायण काकडे (३१४), गणेश रघुनाथ कापसे (३३८), संजय गोरख चव्हाण (३१३), हरीश गोरख चौधरी (३१०), शरद नारायण तांबोळी (३५३), प्रशांत लक्ष्मण नागरे (३९६), लक्ष्मण मंगा नागरे (३३०) तर श्याम हिरालाल पाटील (३३१) विजयी झाले. तर इतर मागास प्रवर्गातून किशोर नारायण तांबोळी (३८३), महिला राखीव मधून शशिकला रणजित कदमबांडे (३७४) तर संगीता महेंद्र सांगळे (३६३), अनुसूचित जमाती मधून मनोज पंढरीनाथ ठाकरे (३९७), भटके विमुक्त जाती मतदार संघातून संजय शंकर नागरे (३४९) विजयी झाले. या निवडणुकीत आमदार डॉ. विजयकुमार गावित गटाने वर्चस्व राखले. डॉ.गावित गटाचे जितेंद्र ओगले, शरद तांबोळी यांनी तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाकडून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दीपक गवते, शेतकी संघ संचालकांनी धुरा सांभाळली.

बातम्या आणखी आहेत...