आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या हातांनी कलाकौशल्याचा वापर करत येथे आयोजित ‘फॅशन शो’मध्ये सादरीकरण केले. आयटीआयमार्फत घेण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये आदिवासी मुलींमधील आत्मविश्वास दिसला. पहिल्यांदाच घेतलेल्या या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार, शिर्वे येथील आयटीआयच्या आदिवासी विद्यार्थिनींनी पारंपरिक ते पाश्चिमात्य पद्धतींचा पेहराव करत ‘रॅम्प’वर सादरीकरण केले. यावेळी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत मीनल पवार या विद्यार्थिनीने प्रथम स्थान पटकावले. तिला परीक्षक शिवानी परदेशी यांच्या हस्ते विजयाचा मुकुट परिधान करण्यात आला. फॅशन डिझायनिंग, ड्रेस मेकिंग हे कोर्स विद्यार्थिनींना शिकवले जातात. त्यास हा एक भाग जोडला आहे. परीक्षक म्हणून कौस्तुभ मराठे व शिवानी परदेशी यांनी काम पाहिले. प्राचार्य डी.एच. कावडकर, वाय.एस. पाटील, एल.एच. गांगुर्डे, पी.ए. महाले, महाजन उपस्थित होते.
या विद्यार्थिनींनी पटकावले विविध किताब : आयटीआयच्या सभागृहात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या या फॅशन शोमध्ये बेस्ट कॉश्च्यूम स्नेहा पवार, बेस्ट मॉडेल नीता पवार, बेस्ट मेकअप अनुराधा बारी, बेस्ट स्माइल योगेश्वरी, बेस्ट अॅटिट्यूड सोनिया पाडवी, बेस्ट वॉक कांचन शांतिलाल यांना किताब देण्यात आला. तसेच पल्लवी मावची, नेहा पाडवी, आरती पाडवी, निकिता सूर्यवंशी यांनीही सुयश मिळवले. तर मीनल पवार, साक्षी तिरमले, सारिका पाडवी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तसेच तृतीय किताब पटकावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.