आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचारण:नवापुरात तिसऱ्या मजल्यावर आग;‎ संसारोपयोगी साहित्य जळून खाक‎

नवापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लाईट बाजारात शुक्रवारी‎ दुपारी साडेबारा वाजता सुमारास‎ राजूभाई नागरमल अग्रवाल यांच्या‎ निवासस्थानी तिसऱ्या मजल्यावर‎ अचानक आग लागल्याने आगीने‎ तात्काळ रुद्ररूप धारण केले. आग‎ विझवण्यासाठी आजूबाजूच्या‎ व्यापारी व नागरिक मदतीला धावून‎ आले. व्यापाऱ्यांनी तात्काळ नवापूर‎ पोलिस व पालिकेच्या अग्निशमक‎ दलाला पाचारण केले. अग्निशामक‎ दल तात्काळ दाखल झाले असून‎ आग विझवण्याचे काम करण्यात‎ आले. या आगीत सुदैवाने कुठलीही‎ जीवित हानी झाली नसून किरकोळ‎ नुकसान झाले आहे.‎ अर्धा पाऊण तासानंतर आग‎ नियंत्रणात आली. भर बाजारात‎ आग लागल्याने घटनास्थळी‎ बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. किती‎ नुकसान झाले अजून तरी स्पष्ट‎ झाले नाही. स्थानिकांनी मिळेल त्या‎ साधनाने आग विझवण्यासाठी‎ प्रयत्न केला.

परंतु तिसऱ्या‎ मजल्यावर आग लागल्याने धुराचे‎ प्रमाण जास्त असल्याने आग‎ विझवण्यासाठी नागरिक व्यापाऱ्यांना‎ दमछाक करावी लागली. त्यानंतर‎ अग्निशामक दलाचे बंब आल्याने‎ आग विझवण्याचे काम करण्यात‎ आले. महसूल विभागाने आगीचा‎ पंचनामा करून नुकसान भरपाई‎ मिळावी अशी मागणी अग्रवाल‎ कुटुंबांनी केली आहे. दुपारी गिझर‎ आणि इन्वर्टर बॅटरी मुळे शॉर्ट‎ सर्किटने आग लागण्याचा प्राथमिक‎ अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु‎ अजून कारण मात्र स्पष्ट झालेले‎ नाही आग लागल्यानंतर‎ नागरिकांनी घरातील ज्वलनशील‎ सिलिंडर इतर साहित्य बाहेर काढून‎ आग आटोक्यात आणण्यासाठी‎ प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...