आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाई:गोळीबार सराव; ईदगाह मैदान परिसरात मनाई

नंदुरबार6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलाडी रोड, ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल, असे जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...