आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:डीजे वाजवल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील काकासाहेब नगरात १७ डिसेंबर रोजी हळदीच्या कार्यक्रमात रात्री अकरा वाजेनंतर डीजे वाजवल्याच्या कारणावरून डीजेचालकासह आयोजक ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लग्नच्या हंगामात रोज हळदी व मेहंदीच्या कार्यक्रमात रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत डीजे वाद्य लावून लोकांची झोप उडवणाऱ्या नागरिकांना चपराक बसली आहे.

शासनाने दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत काकासाहेब नगरात रात्री अकरा वाजेपर्यंत डीजे वाजवण्यात येत होता. विलास ज्ञानेश्वर घात्रक यांच्यासह आयोजक रवींद्र सांडू पाटील, शुभम रवींद्र पाटील, राहूल दिलीप गुलाले, विनय धनंजय मराठे या पाच जणांच्या विरोधात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पौलाद पवार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...