आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम 13 डिसेंबरला

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी ७ डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ १३ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती माहिती संजय गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिनासापासून सर्व राज्ये आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मंगळवार १३ डिसेंबरला दुपारी १२ वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...