आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुद्ध मनाने धम्माचे पालन केल्यास मानवी जीवन सुखकर होईल. धम्म आचरणात आणावा लागतो. पंचशील आचरणाने मन शुद्ध होते. समाजात बंधुभाव, एकता, एकात्मिकता निर्माण करायची असेल तर समाजा समाजात अशा प्रकारे शिबिर आयोजित झाले पाहिजे, असे प्रतिपादन अक्कलकुवा येथील पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत यांनी केले. महामाया बुद्ध विहार मोहिदा तालुका शहादा येथे पूज्य भन्ते आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय चिवरधारी श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या समारोप प्रसंगी संभाजी सावंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी श्रामनेर भगवान बिरारे होते. प्रमुख अतिथी म्हणून शहाद्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे, सभापती वीरसिंग ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रावल, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुनील गायकवाड, डॉ. रवींद्र गुलाले, भगवान महिरे, डॉ. सुमीत देवरे, अलका जोंधळे, सुरेखा महिरे, अरुणाबाई महिरे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा महिरे आदी उपस्थित होते. या वेळी अॅड. डी. एन. पिसोडकर, मधुकर भिसे, सुनील गायकवाड, भंन्ते भिमानंद, भंन्ते आनंद, भन्ते आर्यानंद, भन्ते पियदस्सी, भन्ते अनोमदर्शी, भन्ते सुमेध आदींसह मान्यवरांनी आपले अनुभव मांडले. सूत्रसंचालन माजी श्रामनेर सुधीर ठाकरे यांनी केले.
पंचशीलाचे पालन करावे
भन्तेजी आनंद म्हणाले शील, श्रद्धा, बुद्ध धम्मात कर्म सिद्धान्त महत्वपूर्ण मानला जातो. बुद्ध धम्मात आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी पंचशीलाचे पालन केले पाहिजे. पंचशील म्हणजे मानव मुक्तीच. प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे म्हणाले, संविधानाचा सारनामा मानवाच्या मुक्तीसाठी आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानव कल्याणाचे तत्त्व मांडले. मानव कल्याणाचे तत्त्वच बुद्ध धम्माचा मूळ पाया आहे, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.