आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलाढाल:घोडेबाजारात पहिल्यांदाच झाली चार कोटींपेक्षा जास्त उलाढाल

सारंगखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या यात्रोत्सवात भरणाऱ्या घाेडेबाजारात यंदा प्रथमच ९९१ घाेड्यांच्या खरेदी-विक्रीतून ४ काेटी ७ लाख २१ हजार १६१ रुपयांची उलाढाल झाली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये ११०१ घाेड्यांच्या विक्रीतून ३ काेटी ६५ लाख ३१ हजार ४०१ रुपयांची उलाढाल झाली हाेती. येथील यात्राेत्सवाला ३०० वर्षांची परंपरा लाभली आहे.

तेव्हापासून घोडे बाजारही भरतो. विविध प्रजातीतील घोडे या बाजारात खरेदी-विक्रीसाठी दाखल हाेतात. यावर्षी २ हजारांहून अधिक अश्व दाखल झाले आहेत. आतापर्यंत ११ लाख रुपयांचा महागडा घोडा राजकोट (गुजरात)चे जेवजीभाई सोळंकी यांनी खरेदी केला आहे. यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन विक्रमाची नोंद करणार आहे. घोडे खरेदी-विक्रीतून पहिल्यांदाच ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. अजून ८ दिवस घोडे खरेदी विक्री चालू राहणार आहे. ही संख्या अधिक वाढू शकते अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...