आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या वादातून शेकडोंच्या संख्येने असलेल्या एका समुहाने अक्कलकुवा येथे १० रोजी मध्यरात्री तुफान दगडफेक करून वाहनांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे दि.११ पासून अक्कलकुवा शहरात घटनेचा निषेध नोंदवत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले आहेत. समाजकंटकांच्या निषेधार्थ नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशीही शहर कडकडीत बंद पाडून सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.
शहरात दगडफेक व वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेत एकूण ४८ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत २८ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यातील २६ आरोपींना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य दोघांची चौकशी सुरू आहे. इतर आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
पुन्हा एकाविरुद्ध गुन्हा दाखल : दरम्यान सोमवारी अक्कलकुवा शहरातील एका युवकाने पुन्हा अक्कलकुव्यातील वाहनांच्या तोडफोडीचे फोटो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवून नुकसानग्रस्तांच्या भावना दुखावल्याप्रकरणी पुन्हा एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.