आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुट:दुचाकीच्या डिक्कीतून चौघांनी लांबवले साडेसहा लाख; लुटीत तरुणी सहभागी

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून तीन तरुण आणि तरुणीने साडेसहा लाख रुपये लांबवल्याची घटना शहरातील डोंगरगाव रस्त्या लगत डॉ. कुलकर्णी हॉस्पिटलच्या समोर गुरुवारी सायंकाळी घडली.

कापसाचे व्यापारी संतोष कोठारी हे दुचाकीच्या डिक्कीत साडेसहा लाख रुपये घेऊन पेमेंट देण्यासाठी डोंगरगाव रस्त्यावरू जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तरुण आणि तरुणीने त्यांची दुचाकी अडवून तुला गाडी चालवता येत नाही का? असे म्हणत हुज्जत घातली. त्यानंतर तरुणाने दुचाकीची चाबी काढून तरुणीच्या हातात दिली. तरुणीने व्यापारी कोठारी यांना गाफिल ठेवून त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडी केली आणि ते दोघे चावी घेऊन पुढे चालू लागले. त्यांच्याकडून चाबी घेण्यासाठी कोठारी त्यांच्यामागे गेल्यावर लगेच दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी कोठारी यांच्या दुचाकीतून साडेसहा लाख रुपये ठेवलेली पिशवी घेऊन पळ काढला. तरुणीने चाबी दिल्यानंतर कोठारी दुचाकी घेऊन निघत असतानाच एका दुकानदाराने डिक्कीतून दोन तरुणांनी पिशवी काढून नेल्याचे सांगितले. त्यानंतर लुटीचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पीआय राजेश मोरे यांनी घटनास्थळी माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...