आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:परिवहन कार्यालयातर्फे चार फेसलेस सुविधा

नंदुरबार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या १६ सप्टेंबर राेजी जारी अधिसूचनेनुसार ५८ सेवा फेसलेस पद्धतीने नागरिकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी ९ सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्यात येत आहेत. यात अजून ४ सेवांची वाढ झाली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली आहे.

या सेवांमध्ये अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे, अनुज्ञप्तीची माहिती मिळवणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतनीकरण या चार सेवांचा समावेश आहे. या चार फेसलेस सेवा नागरिकांच्या आधार क्रमांकाद्वारे देण्यात येतील. या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिडकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...