आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतजमिनीचा वाद मिटवण्यासाठी पाच लाख रुपये दिले नाही, याचा राग येऊन शहादा तालुक्यातील मोदीलाल पाड्यात सोळा जणांनी सामूहिक हल्ला चढवत मारहाण केली. यात चौघे जण जखमी झाले. प्राणघातक शस्त्रांनी वार करण्यात आला. याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीत लालसिंग पारशी तडवी (४५), किसन सत्या वळवी, रमेश कागडा डोमखले, भांगडा जत्र्या वसावे हे चौघे जखमी झाले असून, मोत्या पाडवी, विलास पवार, जयराम पवार, करणसिंग वळवी, मुन्ना कथ्थू पवार, गोरख भामण्या वळवी, सत्या सतिलाल पवार, कैलास उदसिंग पवार, वन्या भामन्या वळवी व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोटरी क्लब आॅफ नंदनगरी व एका सामाजिक संस्थेने हे गाव दत्तक घेतले होते. या गावात मात्र मारहाणीची घटना होऊन गालबोट लागले. धाऱ्या, काठ्या, प्राणघातक हत्यारांनी वार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.