आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाकूचा धाक दाखवत कापसासह ट्रक लुटून नेल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास कुकरमुंडा फाटाजवळ घडली. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार १ फेब्रुवारी रोजी कन्नड तालुक्यातील चापनेर येथून कापूस भरून ट्रक (एमएच-२० ईजी-०७५३) ही निघाली होती. गाडीवर चालक म्हणून लखन अंबादास ढगे (वय ३२, रा. जांबाडा टाकळी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) व क्लिनर मेहमूद दाऊत शेख (रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव) होते. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार येथून कुकरमुंडा फाटा येथे हा ट्रक आला असता, फाट्यावर दोन जण कॅन घेऊन उभे होते, त्यांनी आवाज देऊन ट्रक चालकाला त्यांच्याकडील डिझेल संपले आहे, असे सांगितले.
मात्र चालकाने रात्र असल्याने गाडी थांबवली नाही. तेथून अक्कलकुवा रस्त्याकडे चार ते पाच किलोमीटर गाडी पुढे गेली असता कुकरमुंडा फाटा येथे थांबलेल्या इसमानी त्यांच्या कडील ट्रकने कापूस भरलेला ट्रकचा पाठलाग केला व पुढे जाऊन ट्रक पुढे त्यांची गाडी आडवी लावली. त्यामुळे कापूस भरलेला ट्रक चालकाने गाडी थांबवली. ट्रक समोर आडव्या लावलेल्या ट्रकमधून अंदाजे २५ से ३० वयोगटाच्या दरोडेखोरांनी चाकू काढून ट्रक ताब्यात घेत शहादा रोडकडे वळवून साधारण १० किलोमिटर अंतरावर धडगाव रोडकडे वळवला. पुढे साधारण ७ किलोमिटर अंतरावर जाऊन आंबागव्हाण फाटा ते रोझवा पुनर्वसन गावाच्यामध्ये रोडावर ट्रक थांबवूली. तेव्हा त्यांच्या ट्रकमधील अन्य दोघांनी ट्रक चालक व क्लीनर या दोघांना नॉयलॉन दोरीने बांधून इलेक्ट्रीक डीपी जवळ बाजूला बसवून जीवे मारण्याची धमकी दिली. एकाने चालकाच्या खिशातून १२ हजार रुपये व दोन मोबाईल काढून घेतले.
त्यानंतर चारही जनांनी चालकाच्या गाडीतून साधारण १२ क्विंटल कापूस व गाडीचे डिझेल टाकीतून साधारण ६० लिटर डिझेल काढून घेऊन त्यांच्या ट्रकमध्ये बसून पळून गेले. सकाळी सात वाजेच्या सुमारास चालकाने ११२ वर कॉल केला. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. याप्रकरणी चालक लखन आंबादास ढगे (वय ३२, रा.जांबाडा रा. टाकळी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.