आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार शहरातील मिशन हायस्कूल परिसरात असलेल्या चर्च वर नाताळनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. एसए चर्च संचलित फ्रँकलीन मेमोरियल चर्च येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रम होत असतात. नाताळच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विद्युत रोषणाईने लक्ष वेधून घेतले आहे.
नंदुरबार शहरात सद्य:स्थितीत आहेत प्रमुख दोन चर्च
नंदुरबार शहरात दोन चर्च आहेत. जुने चर्च सुमारे शंभर वर्षांपूर्वी बनवण्यात आले आहे. तसेच नवीन चर्च २००४ या वर्षी बनवले या चर्चला फ्रँकलीन चर्च असे नाव देण्यात आले आहे. सुवार्ता अलायन्स चर्चची स्थापना शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश मिशनरी फ्रांकलीन यांनी केली होती. त्यांच्या स्मरणार्थ नवीन चर्चला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या चर्चला अठरा वर्षे पूर्ण झाले असून १९ डिसेंबर २००४ रोजी स्थापना झाली होती. त्याचा वर्धापनदिन नुकताच साजरा केला.
नाताळनिमित्त कार्यक्रम : नाताळनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात नाताळच्या दिवशी चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना व व्याख्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती एसएएम ट्रस्टच्या संचालिका नूतनवर्षा वळवी यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.