आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तीन कोटी 72  लाख 2  हजारांची फसवणूक; 9  जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मत्थ्यूत मायक्रोफिन लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात मार्च २०२२ ते जूलै २०२२ या कालावधीत अविनाश भालेराव यांच्यासह नऊ जणांनी शासनाकडून मोफत पाच हजार रूपये मिळतील. याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ३ कोटी ७२ लाख २ हजार ९१४ रूपयांचाी फसवणूक केली.

या प्रकरणी झाेनल मॅनेजर अंकुशसिंग कृष्ण कुमारसिंग गहलोद यांनी तक्रार दिल्यानंतर अविनाश जगदिश भालेराव (रा.नंदुरबार), शिलाबाई सोनवणे (रा.ठाणेपाडा), सुशिला पाडवी (रा.नांदरखेडा), हिलाबाई चौरे (रा. टाकलीपाडा), कल्पना वळवी, नामदेव वळवी (रा.नळवे), गुजरभवाली, भुरीबाई भिल (रा.चौपाळे), रूकसान शेख (रा.नंदुरबार), जाहेदा या नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. ते पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...