आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा४ जानेवारी रोजी प्रभा आयुर्वेद रथयात्रा नंदुरबार शहरात दुपारी दाखल होत असून यात्रेच्या समाप्तीनंतर दुपारी ३.३० वाजेपासून आयुर्वेद चिकित्सक रूग्णांची मोफत तपासणी करून सात दिवसांची औषधी मोफत देणार आहेत. धुळे येथील आयुर्वेदाचार्य पी. टी. जोशी नाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यभरा रथयात्रा काढण्यात आली. नंदुरबार शहरात शिबीर झाल्यानंतर यात्रा धुळयात जाईल. तिथेच या यात्रेचा समारोप होणार आहे. जास्ती जास्त रुग्णांनी माेफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित यांनी केले आहे.
डॉ. राहुल रघुवंशी यांच्या निवासस्थानी पत्रपरिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राजेंद्र गावित यांनी या शिबिराविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी डॉ. राहुल रघुवंशी, डॉ. मनीषा वळवी, डॉ. श्रुती देसाई, डॉ. उज्ज्वला वळवी, डॉ. भगवान पटेल, डॉ. वसंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पुढे राजेंद्र गावित म्हणाले, की आयुर्वेदाचा प्रचार होण्यासाठी धुळे येथील प्रसिध्द वैद्यशिरोमनी पी. टी. जोशी यांच्या शिष्यांनी त्यांच्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला आहे.
उद्या होणाऱ्या या मोफत आरोग्य चिकित्सक शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्रकुमार गावित यांनी केले आहे. हे शिबिर खोडियार मातेच्या पुढे, आधार हॉस्पिटल जवळ, रघुवीर नगरातील सामाजिक सभागृहात होईल, असेही ते म्हणाले. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही राजेंद्र गावित यांनी या वेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.