आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची तपासणी:बिलाडी येथे आयाेजित शिबिरामध्ये १०४ रुग्णांची माेफत नेत्र तपासणी

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त भारतीय किसान सेना, भिलीस्थान लायन सेना व कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाच्या वतीने तालुक्यातील बिलाडी येथे जि.प. शाळेच्या आवारात आयाेजित माेफत नेत्र तपासणी शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर, किसान सेना भटके जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र माळी ,तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, भिलिस्थान लायन सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकित वळवी, धुळे जिल्हाध्यक्ष सुखमा सोनवणे, बिलाडी जि.प शाळेचे मुख्याध्यापक अनिल हिरे, संगीता वसावे, रवींद्र मोरे, आधार ठाकरे, रविदास वळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कांतालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ.गोविंद वैद्य यांनी ग्रामस्थांची तपासणी केली. त्यांना पाडवी यांनी सहाय्य केले.

विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
आदिवासी दिवस निमित्त आयोजित शिबिराप्रसंगी बिलाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय किसान सेनेचे प्रदेश प्रवक्ते अर्जुन पवार यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...