आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग शिबिर आयोजन:योग दिनानिमित्त शहाद्यात मोफत आरोग्य शिबिर; 21 पर्यंत रोज सकाळी योग शिबिर होणार

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहादा तालुका पतंजली योग समितीतर्फे १५ ते २१ जून या सप्ताहात मोफत भव्य आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर दोंडाईचा रस्त्यावरील खरेदी-विक्री संघात आयोजित केले असून, २१ पर्यंत रोज सकाळी योग शिबिर होणार आहे.

तालुका पतंजली योग समितीतर्फे १५ ते २१ जूनदरम्यान दररोज सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत योग शिबिर घेण्यात येईल. तसेच १९ रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात आयुर्वेदाचार्य डॉ.राहुल रघुवंशी तपासणी करणार आहेत. मोफत योग शिबिरासाठी ओम पतंजली आरोग्य केंद्र, जाधव बंधू कॉम्प्लेक्स, शिवार अॅग्रो एजन्सीज्, पुरुषोत्तम मार्केट, युग सायकल वर्ल्ड, जुना मोहिदा रस्ता या ठिकाणी नावनोंदणीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...