आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धागे घट्ट:मैत्रीचे धागे घट्ट विणताना वार्धक्याने झुकलेल्या मित्रांना आले गहिवरून

नंदुरबार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेजने दिलेली शिकवण, केलेले संस्कार, जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी रुजवलेली सकारात्मक इच्छाशक्ती ही शिदोरी घेऊन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच कॉलेजबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यांसोबतचे मैत्रीचे धागे अधिक घट्ट विणण्यासाठी तब्बल ५१ वर्षांनंतर येथील जीटीपी आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज १९७१ मधील प्रथम वर्ष सायन्सचे विद्यार्थी एकत्र आले. या वेळी एकमेकांना भेटून सर्वांनाच गहिवरून आले.

स्नेहसंमेलनात बहुतांश विद्यार्थी पत्नीसह सहभागी झाले. विशेष म्हणजे ५१ वर्षांपूर्वी शिक्षण देणारे गुरुजन सुद्धा उपस्थित होते. माजी प्राचार्य बी. एस. पाटील, डी. एस. पाटील, जी.डी. पाटील, बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले. ५१ वर्षांनंतर सर्वांनी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीचा परिचय मित्रांना सांगितला व जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी धुळ्याचे प्रसिद्ध डॉ. दिलीप पाटील, डॉ. युवराज पवार, डॉ. नंदकिशोर भावसार, प्रा. राजेंद्र वाणी, आत्माराम माळी, माजी मुख्याध्यापक श्रावण मराठे, उद्योजक राजन राजवाणी, इंजिनिअर ज्ञानेश्वर तांबोळी, प्रा. जिभाऊ काळे, वामन अहिरे, उद्योजक मदन शिंपी, प्रकाश पाटील, प्रा. पीतांबर पाटील, उद्योजक पीयूष शहा, दिलीप पुराणिक, हिरामण साळुंखे, ॲड. के. एच. वळवी, निला गोसलिया, आशा शहा असे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...