आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा घरफोडीचे गुन्हेही उघड:फरार आंतरराज्यीय गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तळोद्यासह राज्यात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तसेच १६ गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहर गाठून तेथे चौत्राम मंडीच्या परिसरात लपलेल्या आरोपी नवलसिंग ऊर्फ ठाकूर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया यास ताब्यात घेतले. या संशयित आरोपीने गेल्या एक ते दीड वर्षात त्याच्या साथीदारांच्या मदतीने तळोदा शहरात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर व घरांचे कुलूप तोडून घरफोडी केल्याचे सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, म्हसावद, सारंगखेडा, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील सराफ व किराणा व्यावसायिकांच्या दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी पकडून १६ गुन्हे उघड केले होते. त्या गुन्ह्यांमध्ये देखील नवलसिंग ऊर्फ ठाकूर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरीया हा फरार होता. इंदूर येथून ताब्यात घेतलेल्या नवलसिंग ऊर्फ ठाकूर (वय ४०), रा.नाहवेल, पोलिस ठाणे बाग, ता. कुक्षी, जि. धार (मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात व गुजरात, गोवा, मध्य प्रदेश या राज्यात मिळून तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत.

त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासाकरिता तळोदा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले.ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...