आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:हिरा प्रतिष्ठान संस्थेच्या क्रीडांगणावर गगनभरारी; उन्हाळी शिबिराला मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील हिरा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने तसेच ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व इंडियन |डव्हेंचर स्पोर्ट‌्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी महाविद्यालयाच्या मैदानावर १५ दिवसीय उन्हाळी शिबिर घेण्यात आले. या उन्हाळी शिबिराचा नुकताच समाराेप समारंभ झाला. या गगनभरारी शिबिराला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी हिरा उद्योगसमूहाचे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र चौधरी, प्रथमेश चौधरी, ऑल नंदुरबार जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे, प्रशिक्षक दीपेश गायकवाड, सचिन गोंधळी, पवन बिराडे आदी उपस्थित होते. शिबिरात मुला-मुलींना मानसिक तणावमुक्त करणे, स्वतःचे शरीर निरोगी ठेवणे, कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन बिघडू न देता निर्भयपणे संकटाशी दोन हात करणे व स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात ६० मुलांनी सहभाग नोंदवला. कराटेचे बेसिक प्रकार काताज, कुमिती, किक, पंचेस, ब्लॉक टेक्निक व डिफेन्सचे प्रकार शिकवण्यात आले. तसेच सेमी कॉन्टॅक्ट, लाइट कॉन्टॅक्ट फाइट, पॉइंट फायटिंगचेही प्रशिक्षण देण्यात आले. विविध योगासने, रोप स्किपिंगचे प्रकार, म्युझिकच्या तालावर फ्री स्टाइल स्किपिंग करणे असे अनेक प्रकार मुलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी संस्थाध्यक्ष चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रथमेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देत खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरा उद्योग ग्रुप सदैव तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. जिल्हा कराटे असो.चे अध्यक्ष संतोष मराठे, गणेश मराठे यांनी आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...