आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:तळोदा येथे ऑनलाइन सव्वा लाखात गंडवले

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डवर पेनल्टी लावली असून तात्काळ बंद करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा, असे सांगून त्यावर आलेल्या ओटीपी मागवून १ लाख १७ हजाराची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत तळोदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तळोदा येथील ॲल्युमिनियम सेक्शनचे मालक मुकेश पवार यांना मी बँकेतून बोलत असून आपल्या क्रेडिट कार्ड वरती पेनल्टी लावण्यात आली आहे. तात्काळ आपण पेनल्टी बंध करा अन्यथा आपणास मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, असे सांगून संबंधित व्यक्तीस सांगितले.

क्रेडिट कार्डवर एक दोन वेळेस पेनल्टी लागली असल्या कारणाने मुकेश पवार यांनी सदर बाब खरी असल्याचे समजून संबंधित चोरट्यास अधिक माहिती विचारली. त्याने आपणास एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल असे सांगून अॅप्लिकेशन डाउनलोड करून मुकेश कडून पासवर्ड मिळवला व बँक खात्यातून १ लाख १६ हजार ९७१ रुपये लंपास केले. बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्या बोलण्यावर विश्वास ठेवून गोपनीय माहिती दिल्यामुळे काही वेळातच खात्यातील रक्कम काढल्याचा संदेश मुकेश पवार यांचा मोबाइलवर येऊन धडकताच आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली.

बातम्या आणखी आहेत...