आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बैठक:महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाची गणेशोत्सव कार्यकारिणी जाहीर

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अध्यक्षपदी अजय जयसिंग राजपूत, उपाध्यक्ष गणेश दिनकर राजपूत, सचिव कैलास महेंद्रसिंह राजपूत, खजिनदार राजेंद्र यशवंत राजपूत यांच्या समावेश आहे.श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहिनीराज लक्ष्मण राजपूत व रणजितसिंग नारायण राजपूत यांच्या नेतृत्वात आणि सभासदांच्या व समाज बांधवांच्या उपस्थितीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बैठक मोठा मारुती मंदिराच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ बापूराव हरसिंग राजपूत होते. गणेशोत्सव समिती याप्रमाणे अध्यक्ष अजय जयसिंग राजपूत, उपाध्यक्ष गणेश दिनकर राजपूत, सचिव कैलास महेंद्रसिंह राजपूत, खजिनदार राजेंद्र यशवंत राजपूत, सभासद दीपक सतीश राजपूत, जितेंद्र सुभाष राजपूत, नितीन गोविंदा राजपूत, मोहित मदन राजपूत, प्रफुल चुडामण राजपूत, राजेंद्र भिका राजपूत, कमलेश सोमनाथ राजपूत, रोशन मदन राजपूत, योगेश हेमंतसिंह राजपूत, नितीन विजय राजपूत, नरेंद्र नामदेव राजपूत यांची निवड केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संस्थापक अध्यक्ष मोहिनीराज लक्ष्मण राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन प्रवीण लक्ष्मण राजपूत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...