आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 2 लाख तीस हजार 140 रुपये मुद्देमाल जप्त

नवापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चौपदरीकरणाच्या कामावर असलेल्या लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा नवापूर पोलिसांनी केला पर्दाफाश करण्यात आला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील समोरील अर्हम इन्फ्रा लिमिटेड हैदराबाद या कंपनीचे बांधकामाचे साहित्य परिसरात ठेवले असता चोरीला गेल्याची घटना १२ जून २२ रात्री ते पहाटेच्या सुमारास घडली होती. या संदर्भात अर्हम इन्फ्रा लिमिटेड हैदराबाद कंपनीचे हंसराज देवराम मेघबन्सी यांनी नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या अनुषंगाने नवापुर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत सात संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती (क्रमांक जी जे ०५ वाय वाय ३३८८) वाहन जमा करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील एकूण मुद्देमाल २ लाख तीस हजार १४० रुपये जप्त करण्यात आले आहे. उर्वरित मुद्देमालाचा नवापूर पोलिस शोध घेत आहे या गुन्ह्यातील संशयित आरोपी अक्षय मनोज मोहिते (वय २४ देवळफळी), पवन अरविंद पाडवी (वय २२ लखाणी पार्क), बादल अरविंद पाडवी (वय २० लखाणी पार्क), अरुण महिंद्र गावित (वय २८, भोई गल्ली), समीर बशीर शहा (वय २० देवळफळी), चालक शोएब हुस्नोद्दीन शेख (वय ३२ देवळफळी), लोखंड खरेदी करणारे कय्युम कदीर शहा (वय २१, रा. लखाणीपार्क) असे एकूण सात संशयित आरोपी विरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६० हजार ३६१ किमतीचे लोखंडी साहित्य चोरीला गेले होते. त्यातून अर्धा मुद्देमाल मिळून आला आहे. अर्धा मुद्देमाल पोलिस तपास करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाळासाहेब भापकर सहा. निरीक्षक निलेश वाघ, हेडकॉन्स्टेबल दादाभाई वाघ, विकास पाटील, विनोद पराडके, नितीन नाईक, संदीप सोनवणे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...