आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागौसेवा आणि वृक्षलागवड ही जगातील सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून प्रत्येक मानवाने गौसेवा आणि वृक्ष लागवड हा संकल्प काळाची नव्हे तर वर्तमानाची गरज आहे. या दोन्ही सेवेतून पुण्यकर्म प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले. शहरातील कोरीट रस्त्यावरील ओमशांती नगर परिसरात सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत मंगळवारी रुक्मिणी स्वयंवर देखावा लक्षवेधी ठरला. पश्चिम रेल्वेतील सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत ओंकार खैरनार यांच्या सेवापूर्ती निमित्ताने संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले.
या संगीतमय कथेचे निरूपण राकसवाडे येथील कथा प्रवक्ता भागवताचार्य ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर करीत आहेत. ते पुढे म्हणाले की, नेहमी भौतिक सुखाकडे धावणाऱ्या मानवाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने ४४ अंशांपर्यंत तापमान पोहोचले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गौसेवा आणि वृक्षलागवड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राकसवाडे येथील गौ, गीता, गोपी, वृक्ष सेवा समितीच्या माध्यमातून गाईंची सेवा, गीता वाटप आणि शिक्षण, वृक्ष लागवड, वृक्ष दान सेवाकार्य होत असून या पुण्य कार्यास दानशूर दात्यांनी सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.