आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:महिलादिनी मुलींना जन्म;‎ दोघींचीही माेफत प्रसूती‎

नंदुरबार‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य‎ साधून शहरातील स्पर्श‎ हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांनी‎ मुलींविषयी सकारात्मक संदेश‎ जावा, या हेतूने महिला दिनी त्यांच्या‎ हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या‎ प्रसुती मोफत करण्याचा निर्णय‎ घेतल्यानंतर आठ मार्च रोजी‎ जन्मलेल्या दोन्ही प्रसुती मोफत‎ केल्या. यामुळे प्रसुती झालेल्या‎ दोन्ही महिलांचे प्रत्येकी तीस हजार‎ रुपयांचा खर्च वाचला आहे. डॉ‎ प्रशांत ठाकरे, डॉ. प्रिती ठाकरे यांनी‎ राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र‎ कौतूक होत आहे.‎ ८ मार्चला सकाळी सात वाजेला‎ सुनिता ढेपे यांनी मुलीला जन्म‎ दिला.

या महिलेने या अगोदर टेस्ट‎ टयूबच्या माध्यमातून खुपदा उपचार‎ केले. पाच लाखांचा खर्च होऊनही‎ त्यांना संतान होत नव्हती. अखेर‎ आठ मार्चला या ४२ वर्षीय महिलेने‎ मुलीला जन्म दिला. तसेच‎ त्यांच्याकडून कुठलीही फी‎ आकारणी करण्यात न आल्याने‎ त्यांच्या चेहऱ्यावर दुहेरी आनंद‎ पाहायला मिळाला. तर दुसरी‎ महिला हर्षा बेलकर या तळोद्याहून‎ आल्या. त्यांनी आठ मार्च रोजी‎ सकाळी आठ वाजेला मुलीला जन्म‎ दिला. दोन्ही प्रसुती या सिझर‎ कराव्या लागल्या. मात्र मुलींची‎ प्रक्रृती उत्तम असून महिला दिनाचे‎ अशा पध्दतीने स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...