आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जीआयएस टूल प्रणाली प्रशिक्षण

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे स्वामित्व कार्य प्रवाह अंतर्गत एमएसआयएस व जीआयएस टूल प्रणालीसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा घेण्यात आली.मी अभिलेख कार्यालयामार्फत गावठाण मोजणी झाल्यानंतर चौकशी करून पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त महेश सिंगल यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी भेट दिली. कार्यशाळेला धुळे येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, नंदुरबार जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक स्वाती लोंढे उपस्थित होते. या वेळी महेश सिंगल यांनी स्वामित्व कार्य प्रवाह अंतर्गत एमएसआयएस व जीआयएस टुल संदर्भात तांत्रिक माहिती दिली. या कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...