आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भात लागवडीला वेग:पारंपरिकतेस फाटा देऊन सातपुड्यात सुगंधीत भाताच्या लागवडीला प्राधान्य

सुधीरकुमार ब्राम्हणे | अक्कलकुवा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक भात फोकण्याच्या पद्धतीत बदल करून आता लागवडीवर भर दिला आहे. त्यात उत्पन्न वाढीसाठी कोलम सारख्या अन्य जातीच्या सुगंधीत भात लागवडीवर भर दिला जात आहे. त्यामुळे दुर्गम भागात भात लागवडीला वेग आला आहे.

अक्कलकुवा तालुका हा अतिदुर्गम भागात व बहुतांश डोंगर दरीत वसलेला तालुका आहे. डोंगराळ परिसर व खडकाळ जमीन ही या परिसरातील खरी ओळख आहे. या जमिनीवर येथील शेतकरी बांधव वर्षांनुवर्षापासून पारंपारिक शेती कसत आले आहेत. अतिदुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने पारंपरिक भाताचे बियाणे फोकून भाताची पेरणी केली जाते. मात्र बदलत्या काळात वेळोवेळी मिळत असणारे मार्गदर्शन आणि सुविधांमुळे मात्र आता काळानुरुप बदल होत असताना दिसू लागलाय. थोड्या फार प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे अतिदुर्गम भागातील शेतकरी आता मात्र सुगंधित व अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या लागवडी कडे वळला आहे. दहेलचा काही परिसर तसेच ओघानी या परिसरात थेट मातीची चिखल मशागत करुन शेतकरी भाताच्या रोपांची लावणी करत आहे. या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता शक्य आहे. त्या ठिकाणी जागोजागी भाताची लावणी करण्यात शेतकरी व महिला व्यस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...