आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगबग:यंदा खरिपासाठी 2 लाख 88 हजार‎ 465 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट‎, 87 हजार 990 मॅट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी २‎ लाख ८८ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर‎ पेरणीचे उद्दिष्ट असून त्यासाठी २१‎ हजार ५७४ क्विंटल बियाणे‎ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात‎ येणार आहे. ८७ हजार ९९० मॅट्रीक‎ टन रासायनिक खतांचे आवंटन‎ मंजूर करण्यात आले आहे, अशी‎ माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार‎ गावित यांनी एका कार्यक्रमात दिली.‎

डॉ. विजयकुमार गावित‎ म्हणाले की, नंदुरबार हा‎ शेतीप्रधान जिल्हा आहे. ‘शेतकरी‎ सुखी तर जग सुखी’ असे म्हटले‎ जाते. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा‎ पोशिंदा असलेला शेतकरी सुखी‎ आणि समाधानी कसा राहिल‎ यासाठी शासनाने विविध योजना‎ हाती घेतल्या आहेत. गोपीनाथ मुंढे‎ शेतकरी अपघात विमा योजनेत २४‎ शेतकऱ्यांच्या वारसांना ४८ लाख‎ रूपयांचे अनुदान वितरित करण्यात‎ आले आहे.

महात्मा फुले शेतकरी‎ कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत‎ कर्जाची नियमित परतफेड‎ करणाऱ्या ५ हजार ७५५ शेतकऱ्यांना‎ २६ कोटी १९ लाख रूपयांचा लाभ‎ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री‎ किसान सन्मान योजनेत १ लाख १२‎ हजार शेतकऱ्यांना १३ हप्त्याचे‎ वितरण झाले आहे.

गतवर्षी सप्टेंबर,‎ ऑक्टोबर २०२२ दरम्यान झालेल्या‎ अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,‎ गारपीट, वादळ यामुळे बाधित‎ नुकसानग्रस्त १०७ शेतकऱ्यांना मदत‎ देण्यात आली आहे. मार्च २०२३‎ मध्ये ४ हजार ७३० हेक्टरसाठी ८‎ कोटी, १३ लाख,२३ हजारांची मदत‎ सरकारच्या वतीने वितरित केली‎ जाणार आहे. दरम्यान, मे महिना‎ सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडूनही‎ खरीप हंगाची तयारी सुरू करण्यात‎ आली आहे.‎