आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबार:गुजरातमधील सुरत येथील 11 हजार किंमतीची गोल्ड घारी ठरतेय आकर्षण

नवापूरएका महिन्यापूर्वीलेखक: निलेश पाटील
  • कॉपी लिंक
  • नवापूर वासियानी दिली गोल्ड घारीची आर्डर

गुजरात राज्यातील सुरत येथील प्रसिद्ध 'गोल्ड घारी' सुकामेव्याची मिठाई चर्चेचा विषय बनली आहे. त्याची किंमत सुमारे प्रतिकिलो 9 ते 11 हजार रूपये इतकी आहे. गुजरात राज्यासह नवापूर शहरात शरद पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी चंडी पाडवा हा सण साजरा केला जातो. त्या निमित्ताने घराघरामध्ये घारी बनवण्याची, खाण्याची पद्धत आहे.

गुजरात राज्यातील सुरत येथे स्पेशल घारी बनवली जाते. यंदा मात्र सोन्याची लेयर असलेली सर्वाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे त्या मिठाईची किंमत 9 हजारपासून ते 11 हजार पर्यंत आहे.नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने शहरात बहुतांश गुजराती भाषिक लोक वास्तव्यात आहे.गुजराती खानपान अनुकरण केले जाते. सुरत येथे मिळणारी गोल्डन घरी नवापूर शहरातील गुजराती भाषिकांनी ऑर्डर केली आहे.

नवापूर शहरातील लाईट बाजार परिसरामध्ये रविवारी होणाऱ्या चंडीपाडव्या निमित्त मिठाई फरसाणची छोट्याखानी यात्रा भरते.यंदा कोरोनाचे संकट असल्याने मिठाई व फरसाणचे स्टॉल लागणार अशी शक्यता आहे.