आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:राज्य टेनिक्वाइट स्पर्धेत सुवर्णपदक ; 21 जिल्ह्यांचे मुले-मुली सहभागी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र टेनिक्वॉइट असोसिएशनच्या वतीने व धुळे जिल्हा टेनिक्वॉइट संघटनेच्या सहकार्याने ३५ व्या सब ज्युनिअर गट मुले-मुली राज्य टेनिक्वॉइट अजिंक्यपद स्पर्धा २०२२ चे आयोजन हस्ती भवन दोंडाईचा येथे करण्यात आले. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा टेनिक्वॉइट मुलांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.

राज्यातून २१ जिल्ह्यांचे मुले-मुली खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नंदुरबार जिल्हा संघाने सुवर्णपदक पटकावले. या संघामध्ये मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली असून राष्ट्रीय स्पर्धेत मयूर पाटील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघात सहभागी खेळाडूंमध्ये लकी पाडवी, निर जैन, वरुण चौधरी, संयम सुळे, प्रणव चंद्रात्रे आदींचा सहभाग होता. विजयी खेळाडूंना क्रीडा उपसंचालक तथा नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी राज्य संघटनेचे सचिव अनिल वर्पे, हस्ती समूहाचे चेअरमन कैलास जैन, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष पंकज पाठक, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मोडक, सचिव प्रा.डॉ.मयूर ठाकरे, भटू पाटील आदी उपस्थित होते. खेळाडूंना राजेश्वर चौधरी, अमोल चित्ते, प्रदीप माळी, राकेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...