आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 खेळाडूंना सुवर्णपदक; 120 स्पर्धकांनी नोंदवला भाग

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्‍यातील पथराई येथील के.डी. गावीत क्रीडा संकुलात जिल्‍हा हौशी रोलर स्केटिंग असोसिएशन मार्फत ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १२ खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. हौशी रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्‍या हस्‍ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी क्रीडा संचालक प्रा.ईश्वर धामणे, दिनेश बैसाणे उपस्थित होते.

या स्पर्धेत जळगाव, शिरपूर, शहादा येथील एकूण १२० स्पर्धकांनी भाग घेतला. स्‍पर्धा ४०० मी. व २०० मीटरमध्‍ये घेण्यात आल्या. त्यात नंदुरबार हौशी रोलर स्केटिंग असोसिएशनचे एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यापैकी १२ खेळाडूंनी सुवर्ण, १० खेळाडूंनी राैप्य तर ८ खेळाडूंनी कांस्य पदक मिळवले. सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये कौस्तुभ मिलखे, साची शिरसाठ, हर्ष जाधव, व्रज कापडिया, पीयूष पाटील, लोकेश बाविस्कर तर रौप्य पदक मिळवणाऱ्यांत ध्रज शेठ, पार्थ चौरे, वंश त्रिवेदी, हिमांशू माळी, इशिका नाईक तर दिगंबर चौरे, प्रसून पाटील, तेजस जाधव, प्रतीक चव्हाण यांनी कांस्य पदक मिळवले. नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...